
धाराशिव : उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दैनिक'मुंबई तरुण भारत'चे वार्ताहर सोमेश कोलगे यांच्या अटकेचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस उपनिरिक्षक माने यांनी 'मुंबई तरुण भारत'च्या स्टॉलवर येत सोमेश कोलगे यांना तेथून दूर नेण्याचा प्रयत्न केला.
कोलगे यांच्यासोबत विवेक विचार मंचचे भरत आमदापूरेही उपस्थित होते. स्टॉल्सवरील दैनिक 'मुंबई तरूण भारत'च्या पुस्तक विक्रेत्यांनी याबद्दल विचारणा केली असता कोलगे यांना चौकशीसाठी नेत पोलीस ठाण्यात नेत असल्याचे सांगितले. मात्र, त्याचे कारण स्पष्ट करण्यास माने यांनी नकार दिला.
प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली पोलीस कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक माने यांनी मुंबई तरुण भारतच्या स्टॉलवर येत तिथून सोमेश कोलगे यांना तिथून दूर नेण्याचा प्रयत्न केला. विक्री करणाऱ्या व्यक्तींनी या प्रकरणी विचारणा केली असता आपण केवळ चौकशीसाठी आलो असल्याचे सांगितले. सोमेश कोलगे हे दैनिक 'मुंबई तरुण भारत'चे प्रतिनिधी असून साहित्य संमेलनाचे वार्तांकन करण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते.
सोमेश कोलगे यांनी पोलीस
उपनिरिक्षक माने यांना आपली भूमीका स्पष्टपणे सांगितली. साहित्य संमेलन शांततेत पार
पडावे, अशीच आमची भूमीका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाला आणि
तिथल्या व्यवस्थेला लागेल ती मदत करण्याचीही आमची तयारी असल्याचेही कोलगे यांनी
सांगितले. मात्र, तुम्हाला सोबत यावे लागेल,
असे सांगत पोलिस निरिक्षक माने यांनी प्रतिनिधींना दटावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, वरील सर्व प्रकार झाल्यानंतर साधारणत: एका तासाने पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड यांनी स्टाॅलला भेट दिली. तसेच पीएसआय माने व अन्य पोलिस
कर्मचारीही त्यांच्याबरोबर होते. राठोड यांनी यावेळी सुरुवातीला पुस्तकांची माहिती
घेतली, पुस्तके चाळली व त्यातील काही विकतही घेतली.
नंतर मात्र त्यांनी मुंबई तरुण भारतच्या स्टाॅलवर उपस्थित कर्मचाऱ्यांची जुजबी
माहिती घेतली.
साहित्य संमेलनात पत्रकार सोमेश कोलगे यांच्या अटकेचे प्रयत्न@BJP4India @BJP4Maharashtra @bjp4mumbai #sahityasamelan #fatherfrancisdibrito @OfficeofUT @uddhavthackeray #SahityaSammelan #AmitDeshmukh #म #मराठी #मराठीसाहित्य pic.twitter.com/mrhqCiPBqK