जपानमध्ये नववर्षानिमित्त मंदिराबाहेर मुषक प्रतिमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |
Mice in Japan _1 &nb
 


टोकीयो : नववर्षानिमित्त जपानमध्ये एका मंदिराबाहेर मुषकाची मोठी प्रतिमा उभी करण्यात आली आहे. याची उंची तीन मीटर आहे. सोनेरी रंगाचा हा मुषक हातात एक मशाल घेऊन उभा आहे. २०२० चे चिन्ह मुषक असल्याने एका स्वयंसेवी संस्थेने ही प्रतिमा तयार केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला जपानने ऑलंपिक आणि पॅरालिंपिंक खेळांमध्ये जास्तीतजास्त सुवर्ण पदके मिळवण्याचा संकल्प जपानने ठेवला आहे.

 

मि प्रीफेक्चरच्या मिसाटो शहरात ततसुमिजू श्राइन येथे हा पुतळा उभारण्यात आला आहे. वॉलिंटीअर ग्रुप दरवर्षाच्या सुरुवातीला संपन्नतेसाठी निधी बचत करून ठेवते. त्याद्वारे दरवर्षी अशी प्रतिमा साकारली जाते. ही पॉलिस्टर प्रतिमा तयार करण्यासाठी एक महिन्याचा काळ लागला. या समुहाचे नेते किमिओ मसुई यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाअखेरपर्यंत मुषक मंदिरात ठेवण्यात येणार आहे. यामुळे जपानला खेळाच्या क्षेत्रात भरभराट येईल, अशी आशा सर्वांना आहे.

@@AUTHORINFO_V1@@