‘उद्धव साहेबांबद्दल बोलायचं नाही...’,शिवसेना महिला कार्यकर्तीची दादागिरी !

    दिनांक  01-Jan-2020 16:14:02
|


beed_1  H x W:बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासूनच कार्यकर्त्यांची गुंडागर्दी वाढत चालली असल्याचे अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसात समोर आले. अशाच पद्धतीने शिवसेनेच्या मुजोर कार्यकर्त्यांकडून बीड जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्याला लक्ष्य केले,या व्यक्तीने फेसबुकवर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट लिहिली होती. शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने या व्यक्तीच्या वयाचा विचार न शाईने भरलेली बाटली ओतली. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट लिहिली म्हणून या व्यक्तीवर कार्यकर्त्यांकडून ही कारवाई करण्यात आली.शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे ऐकावे यासाठी अधिकाऱ्याला घेराव घातला. त्यात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी
, तेथे उपस्थित बर्‍याच लोकांनी बघ्याची भूमिका घेतली हे पाहून शेवटी एका महिला कार्यकर्तीने शाईने भरलेली बाटली बाहेर काढली आणि त्या अधिकार्याच्या डोक्यावर ओतली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. ज्या व्यक्तीवर शाई टाकली गेली ती व्यक्ती सरकारी अधिकारी आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे सरकार, सत्ताधारी शिवसेना किंवा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील टीका सहन करण्यास तयार नाहीत. अलीकडेच एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांवर टीका केली तेव्हा त्याला मारहाण केली गेली आणि त्याचे मुंडन केले गेले. नंतर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांचा बचाव केला आणि पीडिताला 'नीच' ठरविले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.