डिसेंबरचा जीएसटी महसूल १ लाख कोटींहून जास्त

    दिनांक  01-Jan-2020 19:29:01
|
GST_1  H x W: 0
  


नवी दिल्ली : वस्तू व सेवा करापासून (जीएसटी) सरकारला प्राप्त होणार्‍या महसूलाने डिसेंबर महिन्यात १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सलग दुसर्‍या महिन्यात महसूल एक लाख कोटींच्या पुढे गेल्याने नव्या वर्षाच्या सुरूवातीस आर्थिक आघाडीवर सकारात्मक घडामोड घडली आहे.

 

केंद्र सरकारला जीएसटीद्वारे डिसेंबर महिन्यात प्राप्त झालेल्या महसुलाची आकडेवारी बुधवारी जाहिर करण्यात आली. त्यानुसार डिसेंबर महिन्यात सरकारला जीएसटीद्वारे १,०३,१८४ कोटी रूपये प्राप्त झाले आहे. केंद्रीय जीएसटीद्वारे १९,९६२ कोटची रूपये, राज्य जीएसटीद्वारे २६,७९२ कोटी, एकीकृत जीएसटीद्वारे ४८,०९९ कोटी आणि उपकरांपासून ८,३३१ कोटी रूपये सरकारला प्राप्त झाले आहे.

 

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीएसटी महसूल १.०३ कोटी रूपये होता, तर ऑक्टोबर महिन्यात ९५,३८० कोटी एवढा महसूल प्राप्त झाला होता. जीएसटीद्वारे प्राप्त होणार्‍या महसुलात वाढ करण्यासाठी केंद्र सरकरा प्रयत्नशिल आहे. जीएसटी व्यवस्थेस अधिक मजबुत करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय करचुकवेगिरीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.