'द स्काय इस पिंक' च्या पोस्टरमध्ये झळकली फरहान आणि प्रियांकाची केमिस्ट्री

    दिनांक  09-Sep-2019 12:26:06


 


शोनाली बोस दिग्दर्शित
'द स्काय इस पिंक' चित्रपटाविषयी गेले अनेक दिवस सर्वत्र चर्चा सुरू होत्या. याचे कारण म्हणजे अनेक कारणांनी या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रियांका बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळली आहे. आज या चित्रपटाचे पहिलेवहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.


 

फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांची केमिस्ट्री 'दिल धडकने दो' या चित्रपटामधून प्रेक्षकांना यापूर्वी पाहायला मिळाली आणि त्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंतीही दर्शवली होती. आता हीच केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल, असे या नवीन पोस्टरवरून वाटत आहे. गेले काही दिवस तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेली झायरा वसीम या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे, त्याचबरोबर रोहित सराफसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.

जून महिन्यात चित्रपटाचे शूटिंग संपल्याची घोषणा प्रियांका चोप्राने केल्यावरच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. दरम्यान, येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपणार आहे आणि या उत्साहाचे पसंतीत रूपांतरण होते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.