'कलम ३७०'बद्दलच्या वार्तांकनाविरोधात काश्मिरी पंडितांची अमेरिकेत निदर्शने

    दिनांक  08-Sep-2019 20:32:09 
 
वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयाबाहेर ठिय्या


वॉशिंग्टन
: काश्मिरमध्ये 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर सातासमुद्रापार वॉशिंग्टन डीसी शहरातही याचे पडसाद उमटले. मूळ भारतीय वंशाच्या काश्मिरी पंडितांनी वॉशिंग्टन माध्यमांचा निषेध करत निदर्शने केली. 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर येथील माध्यमांनी या घटनेचे पक्षपातिपणे वार्तांकन करून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप निदर्शनकर्त्यांनी केला.

 


 
 
ग्लोबल काश्मिरी पंडित प्रस्थापित संघटनेचे सदस्य मोहन सप्रू म्हणाले, “आम्ही मूळचे काश्मिरी हिंदू आहोत. आम्ही सर्वजण येथे 'कलम ३७०' आणि कलम '३५ अ' रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवित आहोत. हे दोन्हीही कलम अत्यंत प्रतिगामी होते. आमच्या निषेधाचा मुख्य हेतू आहे कि, 'काश्मीरमधील सद्यस्थितीचे वार्तांकन करताना पाश्चिमात्य माध्यमे आणि 'वॉशिंग्टन पोस्ट' पक्षपातीपणा करत असल्याचा जाब विचारणे. या एकूण दीडशे आंदोलनकर्त्यांमध्ये मुळचे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांतील अमेरिकनही काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी आले होते.