जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडी मित्र मंडळाची 'कला गणेश' संकल्पना

    दिनांक  08-Sep-2019 18:52:27


 


मुंबई : जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडी मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ५८ वे वर्ष आहे. मंडळाच्यावतीने अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विभागातील सर्व चित्रकलाकारांकडुन पेंटिंग काढून घेतल्या आहेत. यासह आर्ट गॅलरीचा देखावा तयार करण्यात आला आहे. सर्व पेंटींग चा उत्सवानंतर लिलाव आणि संबंधित चित्रकाराला त्याचे मानधन अदा करण्यात येइल.उत्सवानंतर देखावे आणि सर्व कला नमुने घरा घरात पोहोचवून कलकाराना मानवंदना देण्याचा प्रयत्न यावेळी मंडळाने केला आहे.
या उपक्रमात प्रमोद देशमुख, स्वप्ना लांडगे, सुमित गोठणकर, अक्षय पै, अभिषेक आचार्य, ऱाकेश कुंभवडेकर, शुभम एरंडोले, अमित राजवडेकर, नितिन वारे, प्रथमेश पवार, संगीत जोशी, वाजीद शेख, गजानन पालेकर, मनिष कदम, प्रणय आणेराव, अनिकेत पुजारे आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता.