भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतींना निरोप

07 Sep 2019 21:50:40



मुंबई
: मुंबईत भरपावसात बाप्पा मोरयाच्या जयघोषात हजारो गणेशभक्तांनी गौरी-गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शनिवारी सकाळपासूनच गणेश भक्तांनी गणेशमूर्तींची विधिवत पुजाअर्चा करून विसर्जनाला प्रारंभ केला. मुंबईतील जुहू, गिरगाव, दादर, माहीम चौपाटी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.

पालिकेने विसर्जन स्थळी जय्यत तयारी केली होती. पालिकेने वैद्यकीय पथक, घनकचरा विभागाचे सफाई कर्मचारी, निर्माल्यासाठी कलश, निर्माल्य वाहून नेण्यासाठी डंपर, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी , विसर्जनासाठी तराफे इत्यादी सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईतील समुद्र, तलाव, खाडी आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी घरगुती ५५४० व सार्वजनिक ३२ , गौरी ९३६ अशा एकूण ६५०८ गणेश मूर्तीं व गौरींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. यामध्ये, फक्त कृत्रिम तलावांत सार्वजनिक ५ व घरगुती ९५२ गौरी १५२ अशा एकूण ११०९ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0