वंचित बहुजन आघाडीत उभी फूट, एमआयएम स्वबळावर लढणार

06 Sep 2019 18:45:18




औरंगाबाद
: भारिपचे बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्याच्या कारणावरून इम्तियाज जलील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट होते. जागावाटपामध्ये प्रकाश आंबेडकरांनी असमानता राखल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे इम्तियाज जलील यांनी पत्रकात म्हणले आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.


एमआयएम या पक्षाला ९८ जागांवर निवडणूक लढवायची होती पण ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे ओवेसी यांच्या पक्षाने वंचित बहुजन आघाडीतुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात अनेक बैठका झाल्या. तसेच
, इम्तियाज जलील यांच्यासोबत ही आंबेडकरांच्या जागावाटपासंदर्भात बैठका झाल्या. परंतु हा तिढा न सुटल्याने अखेर एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला निरोप दिला. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने वंचित बहुजन आघाडीबरोबर निवडणूक लढविली होती. त्यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते.

Powered By Sangraha 9.0