५० व्या वर्षोत्सवानिमित्त एनसीपीए सादर करीत आहे : नक्षत्र नृत्य महोत्सव २०१९

    दिनांक  06-Sep-2019 16:06:17


 

रंजना गौहर, सी. व्ही. चंद्रशेखर आणि इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकार या वर्षीच्या महोत्सवात आपली कला प्रस्तुत करणार

मुंबई : आपल्या ५० व्या वर्षात नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स (एनसीपीए), तीन दिवस चालणारा नक्षत्र नृत्य महोत्सव २०१९ प्रस्तुत करणार आहे. हा महोत्सव एनसीपीए येथे १३, १४ आणि २६ सप्टेंबर २०१९ या दिवशी संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा उद्देश रंजना गौहर आणि समूह (ओडिसी), सास्वती सेन आणि आणि समूह (कथक), सी. व्ही. चंद्रशेखर आणि समूह(भरतनाट्यम), राजश्री शिर्के आणि समूह(कथक), नंदिनी आणि शारदा गणेशन (भरतनाट्यम) अशा महनीय समूहनृत्य आयोजकांची प्रस्तुती असलेल्या नाविन्यपूर्ण समूहनृत्यांची प्रस्तुती आहे.

नक्षत्र महोत्सवावर भाष्य करताना एनसीपीएच्या नृत्य प्रमुख श्रीमती स्वप्नोकल्पा दासगुप्ता म्हणाल्या, “महनीय अशी आमची एनसीपीए या वर्षी आपली ५० वर्षे पूर्ण होण्याचा उत्सव अनेक सुंदर प्रस्तुतीकरणांच्या माध्यमातून साजरा करीत आहे. हे खास वर्ष साजरे करण्यासाठी अनेक नव्या प्रस्तुती सोबतच आम्ही प्रेक्षकांना अतिशय प्रिय असलेली आणि या अगोदर एनसीपीएच्या एनसीपीए नक्षत्र नृत्य महोत्सवात प्रस्तुत झालेल्या काही असाधारण समूहनृत्यांची प्रस्तुती पुन्हा सादर करणार आहे. रवीन्द्रनाथ टागोर यांच्या निर्मितीवर आधारित रंजना गौहर याचे चित्रांगदाआणि प्रा. सी. व्ही. चंद्रशेखर यांची पंचमहाभूतमही प्रस्तुती या त्यातील दोन प्रमुख आहेत. आम्ही राजश्री शिर्के यांचे लोकप्रिय नृत्यनाटक रावण मंदोदरी संवाददेखील परत आणले आहे. त्यासोबतच शारदा गणेशन आणि सास्वती सेन यांच्या नव्या समूहनृत्यांची देखील आम्ही वाट पहात आहोत. यावेळी आम्ही प्रथमच बॉलिवूड मध्ये उपयोगात आणल्या गेलेल्या पंडित बिरजू महाराजजी यांच्या काही सर्वोत्तम समूह रचनांनी एक संध्याकाळ साजरी करणार आहोत. शास्त्रीय नृत्याच्या अष्टपैलू रचनेला मुजरा करीत असतानाच आम्ही त्याचा अनुभव नृत्यनाट्य (चित्रांगदा), वाचिक नृत्य (रावण मंदोदरी संवाद) तसेच नृत्य आणि वास्तूशास्त्र यामधील निसर्गामधील पाचही तत्वांचे आरेखन जसे पृथ्वीसाठी चौरस, अग्नीसाठी उभ्या रेषा इत्यादी असलेले (पंचमहाभूतम) आणि अर्थातच बॉलिवूडमधील कथक प्रस्तुतींची नजाकत येथे दिसेल.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १३ सप्टेंबर २०१९ रोजी रंजना गौहर आणि समूह यांची अत्युत्तम ओडिसी प्रस्तुती चित्रांगदा तसेच शारदा आणि नंदिनी गणेशन आणि त्यांच्या समूहाची उर्जा ही प्रस्तुती सादर केली जाईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ सप्टेंबर २०१९ रोजी आपण सी. व्ही. चंद्रशेखर आणि समूह यांची पंचमहाभूतमप्रस्तुती आणि राजश्री शिर्के आणि समूह यांची रावण मंदोदरी संवादही प्रस्तुती बघणार आहोत.

२६ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी महोत्सवाचा समारोप सास्वती सेन आणि समूहाच्या नजाकत’ (चंदेरी पडद्यावरील कथकचा प्रवास) या कार्यक्रमाने होईल. यामध्ये कथक आख्यायिका असलेल्या पंडित बिरजू महाराज यांच्या बॉलिवूडमध्ये उपयोगात आणल्या गेलेल्या समूह नृत्यांचा समावेश असेल. यामधून कथकच्या स्टेजवरील प्रस्तुतीपासून ते चंदेरी पडद्यासाठी निर्माण केलेल्या सुंदर आणि आकर्षक कथक नृत्यांचा मागोवा घेतला जाईल. स्टेज असो की चंदेरी पडदा, अखेरीला नजाकतहीच रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवीत असते.