'मैदान' च्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण

06 Sep 2019 17:17:27


सध्या बॉलिवूडमध्ये खेळांवर आधारित चित्रपटांचे वारे वाहत असतानाच अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या 'मैदान' या चित्रपटाचे चित्रीकरणाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. १९५२ ते १९६२ अशा दहा वर्षांचा फुटबॉल या खेळाचा सुवर्णकाळ या चित्रपटात रेखाटण्यात येणार आहे. चित्रीकरणाचा दुसरा टप्पा या महिन्यात सुरु होईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

अजय देवगण बरोबरच या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती किर्थि सुरेश आणि गजराज राव हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. अमित रविंदरनाथ शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक असून बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणवा जॉय सेनगुप्ता चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तारळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी औत्सुक्याचे वातावरण आहे.

Powered By Sangraha 9.0