चांद्रयान २ : आज होणार 'विक्रम' लॅण्डींग

06 Sep 2019 10:51:11

 

बंगळुरु : 'चांद्रयान-२' दक्षिण ध्रुवावर उतरताच हे यश मिळवणारा भारत पहिला देश ठरणार आहे. शनिवारची रात्र अवघ्या देशासाठी महत्वाची असेलच मात्र, संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेकडे लागून आहे. चंद्राच्या उत्तर ध्रुवावर अमेरिका, रशिया, चिनी आदी देशांनी आपली याने यापूर्वी उतरवली. मात्र, दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत  पहिला आहे.

चंद्रावर भारताचे पाऊल पडताना हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ७० शाळकरी मुले बंगळुरूच्या इस्रो केंद्रात असणार आहेत. चांद्रयानाने चंद्रापासून केवळ ३५ किमीवरून भ्रमण केले आहे. कुठे उतरायचे ती जागा यान स्वत: ठरवणार आहे. यादरम्यान इस्रोचे निर्देश ते पाळू शकणार नाही.
 

शेवटची १५ मिनिटे हृदयाची ठोके चुकवणारी

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन म्हणाले, 'लँडिंगचा हा क्षण हृदयाचे ठोके चुकवणार आहे. इस्रोने यापूर्वी चंद्रावर अशा प्रकारे कधीच स्वारी केली नाही. रात्री १.४० वाजता चांद्रयान ९० अंशांवर उतरण्यास प्रारंभ करेल. सुमारे १.५५ वाजता दोन क्रेटरदरम्यान ते उतरेल. यानंतर दोन तासांनी ३.५५ लँडरचे रँप उघडतील. सकाळी ५.५५ वाजता रोव्हर (प्रज्ञान) लँडरबाहेर (विक्रम) येऊन चंद्रावर उतरेल. याची छायाचित्रे इस्रोला शनिवारी सकाळी ११ वाजता मिळणार आहेत.

Powered By Sangraha 9.0