'शोले'तील 'कालिया'ची एग्झिट

30 Sep 2019 10:47:49




मुंबई - ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तिनशेहून अधिक भूमिका साकारल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या विविध भूमिका विशेष गाजल्या. 'शोले' चित्रपटातील 'कालिया' आणि 'सरदार मैंने आपका नमक खाया है' हा त्यांचा गाजलेला डायलॉग.

 

गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती खालावली होती. ते उपचार घेत होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी अभिनेता हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त केली जात आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी छोट्या भूमिकाही उत्तम पद्दतीने साकारल्या होत्या. 

Powered By Sangraha 9.0