सिनेसृष्टीतून 'कालिया' ची एक्झिट

    दिनांक  30-Sep-2019 11:30:58
|ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तिनशेहून अधिक भूमिका साकारल्या. 


 

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या विविध भूमिका विशेष गाजल्या. 'शोले' चित्रपटातील 'कालिया' आणि 'सरदार मैंने आपका नमक खाया है' हा त्यांचा गाजलेला डायलॉग.


गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती खालावली होती. ते उपचार घेत होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.


 

अनोखी रात’, ‘जिने की राह’, ‘पगला कही का’, ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘शरीफ बदमाश’, ‘जलते बदन’, ‘बेनाम’, ‘जुर्म और सजा’, ‘इन्सानियतअशा अनेक सिनेमांमध्ये काम केले. मात्र १९७५ साली आलेल्या शोलेया सिनेमातील त्यांची कालियाही भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर अशी ही बनवाबनवीसिनेमातील त्यांनी साकारलेली बळीही नकारात्मक भूमिकाही चांगलीच लक्षात राहिली. तसेच अंदाज अपना अपनामध्ये साकारलेला रॉबर्टही अनेकांच्या चांगलाच लक्षात राहिला.


त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी अभिनेता हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त केली जात आहे.