'मरजावा' चित्रपटातील रितेश देशमुखचे डबिंग पूर्ण

30 Sep 2019 16:29:23


मिलाप झवेरी लिखित आणि दिग्दर्शित 'मरजावा' या चित्रपटातील रितेश देशमुखच्या भूमिकेचे डबिंग आज पूर्ण झाले. याविषयी सोशल मीडियावरून चाहत्यांना माहितीत देताना डबिंगच्या वेळी मिलाप झवेरी यांची आठवण काढल्याचे देखील त्याने यावेळी शेअर केले.

रितेश देखमुख या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तर त्याच्याबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा, रघु नावाच्या एका मवाली मुलाची भूमिका साकारणार आहे. तर तारा सुतारीया देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वल असल्यासारखे भासते आहे. आणि योगायोग म्हणजे रितेश आणि सिद्धार्थ 'एक व्हिलन' नंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना प्रेक्षांना दिसणार आहेत. 'मरजावा' हा चित्रपट ८ नोव्हेंबर ला देशभर प्रदर्शित होईल. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

Powered By Sangraha 9.0