'मर्दानी २' चा डेट रिव्हिलिंग टीजर प्रदर्शित

30 Sep 2019 12:23:36


जोपर्यंत ते थांबत नाहीत तोपर्यंत 'ती' देखील थांबणार नाही अशा आशयाचा 'मर्दानी २' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. त्यानुसार १३ डिसेम्बरला 'मर्दानी २' प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

दरम्यान या टीजर बरोबरच चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या राणी मुखर्जीचा आणखी एक पॉवरफुल लूक प्रदर्शित करण्यात आला. पोलिसांच्या खाकी वर्दीची आणि समाजातील दुष्ट शक्तींवर मत करण्याची त्यांची क्षमता या टीजरच्या माध्यमातून जाणवत आहे. तसेच राणी मुखर्जीच्या नजरेतून कणखरता आणि जरब देखील पाहायला मिळत आहे.

यापूर्वी 'मर्दानी' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आता या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम आणि वाहवा मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच येत्या काही काळात चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित होईलच त्यामुळे प्रेक्षक आता त्याच्या प्रतीक्षेत असतील.

Powered By Sangraha 9.0