अखेर महायुतीची घोषणा ! जागांची घोषणाही रात्रीपर्यंत होणार

    दिनांक  30-Sep-2019 19:54:32


 


नागपूर : गेल्या काही दिवसांपासून युती होणार की नाही या राजकीय वर्तूळातील चर्चांना सोमवारी अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजप आणि शिवसेनेने एका संयुक्त पत्रकामार्फत याबद्दल घोषणा केली आहे. शिवसेना, भाजप, रिपाई आणि इतर घटक पक्षांना एकत्र घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

 
 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक दौऱ्यात व्यस्त असल्याने दोघांनीही एकत्र येत हा निर्णय न देता एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत जागावाटपाचाही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजप - शिवसेना युतीचा अंतिम फॉर्म्युला अखेर ठरला आहे. जागांबाबत अंतिम सहमती झाली आहे. पत्रकाराच्या माध्यमातून युतीची घोषणा होईल, अशी माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.