प्रतीक्षा केवळ ४ दिवसांची, विक्रम लँडरचा चांद्रयान २ ला निरोप

03 Sep 2019 12:04:26




श्रीहरीकोटा

: चंद्राच्या दिशेने मार्गक्रम करणाऱ्या चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठावर उतरण्यास केवळ ४ दिवसांचा अवधी बाकी आहे. विक्रम लँडर आणि प्रयाग रोव्हर मुख्य चांद्रयानापासून वेगळं करण्यात इस्रोला यश आले आहे. विक्रम लँडर आणि प्रयाग रोव्हरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला असून चार दिवसांनी म्हणजे ७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले जाईल. सोमवारी दुपारी विक्रम लँडर यानापासून वेगळे झाले. आणि आज सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी विक्रम लँडरची कक्षा कमी करण्यात इस्रोला यश आले आहे. याबाबतची माहिती इस्रोने आपल्या ट्विटर वरून दिली.


 


विक्रम लँडर सध्या १०४ बाय १०८ किलोमीटरच्या कक्षेत फिरत आहे. मंगळवारी याच्या कक्षा चंद्रापासून आणखी कमी करण्यात येतील. सोमवारी सकाळी बेंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री
, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून 'चांद्रयान-२' पासून विक्रम लँडर विलग करण्याची संदेश प्रणाली यानावरील कम्प्युटरवर अपलोड करण्यात आली. पुढचे २ वर्षे आता चांद्रयान २ चंद्राभोवती फिरणार आहे. भारताच्या या महत्वाकांक्षी उड्डाणातून चंद्राच्या पृष्ठभागावरील अनेक अज्ञात गोष्टींचा शोध घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून २२ जुलै रोजी चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. लॅडर विक्रम ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमीनीवर उतरेल. चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर ६ चाकाचे रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळ होईल. यासाठी ४ तासांचा वेळ लागेल. हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राच्या भोवती फिरणार होते. पण आता त्याचा कालावधी वाढवून दोन वर्ष करण्यात आले येणार आहे. चांद्रयान २ वरील टीएमसी उपकरणाद्वारे चांद्रयान १ चे उर्वरित काम पूर्ण केले जाईल आणि चंद्राचा हाय रिझोल्यूशन थ्रीडी नकाशा तयार करण्यात येईल.

Powered By Sangraha 9.0