शत्रुला धडकी भरवणारं अपाचे हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यात

03 Sep 2019 14:21:49


 


नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक शक्तीशाली मानल्या जाणारे अपाचे हेलिकॉप्टर आता भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सामाविष्ठ झाले आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ हेलिकॉप्टरचा सामावेश वायुदलात करण्यात आला आहे. भारताकडे एकूण २२ हेलिकॉप्टर पुढील काही काळात असणार आहेत.

 

भारत सरकारने अमेरिकेची विमान कंपनी बोईंगशी ४ हजार १६८ कोटी रुपयांसाठी २२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता. 'अपाचे - ६४ ई' हे हेलिकॉप्टर अमेरिकन वायुदलाकडे आहे. जगातील सर्वात अत्याधूनिक व मल्टी रोल कॉम्बट तसेच शक्तीशाली हेलिकॉप्टर, अशी अपाचेची ओळख आहे.

Powered By Sangraha 9.0