मतपेटीतून देवाची काठी

    दिनांक  29-Sep-2019 20:56:40   
जे. पी. नड्डा यांनीही प.
बंगालमध्ये हत्या करण्यात आलेल्या ८० भाजप कार्यकर्त्यांना पितृपक्षात श्रद्धांजली वाहिली. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या ८० कार्यकर्त्यांची हत्या हा विषय खरेच दुःखद. प. बंगालमधील दुर्गम भागामध्ये असेही काही कार्यकर्ते असतील की, ज्यांचा मृत्यूपेक्षाही भयंकर छळ झाला असेल, पण या गोष्टी उघडकीस आल्या नसतील. या हत्या कोणी केल्या? हिंसेच्या जोरावर सत्ता उलथविण्यावर विश्वास ठेवणार्‍या भंपक कम्युनिस्टांनी की धड इकडेही नाही अन् धड तिकडेही नाही, अशा तृणमूल काँग्रेसच्या पुरस्कर्त्यांनी, कार्यकर्त्यांनी? कोणी? या भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचे गुन्हेगार कोण? अर्थात वैयक्तिकरित्या एका एका गुन्हेगाराचे नाव घेण्यापेक्षा खरे हत्यारे तिथले राज्य सरकार आहे, तिथल्या मुख्यमंत्री आहेत.पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या हा चिंतेचा विषय आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा नुकतेच पश्चिम बंगाल दौर्‍यावर होते. नुकताच पितृपक्ष संपला. पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे ते दिवस. जे. पी. नड्डा यांनीही प. बंगालमध्ये हत्या करण्यात आलेल्या ८० भाजप कार्यकर्त्यांना पितृपक्षात श्रद्धांजली वाहिली. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या ८० कार्यकर्त्यांची हत्या हा विषय खरेच दुःखद. प. बंगालमधील दुर्गम भागामध्ये असेही काही कार्यकर्ते असतील की, ज्यांचा मृत्यूपेक्षाही भयंकर छळ झाला असेल, पण या गोष्टी उघडकीस आल्या नसतील. या हत्या कोणी केल्या? हिंसेच्या जोरावर सत्ता उलथविण्यावर विश्वास ठेवणार्‍या भंपक कम्युनिस्टांनी की धड इकडेही नाही अन् धड तिकडेही नाही, अशा तृणमूल काँग्रेसच्या पुरस्कर्त्यांनी, कार्यकर्त्यांनी? कोणी? या भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचे गुन्हेगार कोण? अर्थात वैयक्तिकरित्या एका एका गुन्हेगाराचे नाव घेण्यापेक्षा खरे हत्यारे तिथले राज्य सरकार आहे, तिथल्या मुख्यमंत्री आहेत. ज्यांच्या संवेदना मेल्या आहेत, डोळ्यातले पाणी आणि हृदयातील माणुसकी मेली आहे. कार्यकर्ता भाजपचा असला तरी तो प. बंगालच्या मातीचाच पुत्र होता ना? तो काही परका किंवा शत्रूराष्ट्राकडून आलेला शत्रू नव्हता. पश्चिम बंगालमध्ये जंगलराज आहे, असे म्हणावे का? पण गरज आणि भूक असल्याशिवाय पशु-प्राणी दुसर्‍या प्राण्याची हत्या करत नाही. प. बंगालमध्ये हत्याही झाल्या, त्या सामान्य कार्यकर्त्यांच्या. जे कार्यकर्ते स्थानिक स्तरावर फक्त आपापल्या विचारांची पाठराखण करतात. ती पाठराखण करताना ते घरची जबाबदारीही सांभाळत होते. त्यांची हत्या झाली, कारण सामान्य स्तरातील जनतेच्या मनात दहशत बसावी की, या कार्यकर्त्यांच्या विचारसरणीचे नुसते समर्थनही जरी केले तरी आपलेही राम नाम सत्य होऊ शकते. विचार कधी मरत नाहीत, विचार अमर असतात. कार्यकर्त्यांची हत्या ही त्याचे शरीर संपवते पण त्याच्या संपण्याने त्याच्या विचारांचे अग्निकुंड आणखीनच अमरत्वाकडे जाते. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना या हत्येचा जाब द्यावा लागेल. त्यांनी नाही दिला तरी देवाच्या काठीला आवाज नसतो. ममता बॅनर्जींसारख्यांना या देवाच्या काठीचा प्रसाद मतपेटीतून मिळाल्याशिवाय राहणार नाही.ये डर हमे पसंद है


जागतिक पातळीवर आपल्याकडे कुणीतरी लक्ष द्यावे म्हणून इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेत लक्ष्य कुणाला केले
, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. संघटना भारतीय, संघटनेचे काम कल्याणासाठी अखंड झिजणे. दुसरीकडे इमरान खान आपले रडगाणे गात होता, ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर. जिथे जगभरातली कैफियत विविध कंगोर्‍यातून मांडली जाते आणि पाहिली जाते. इथे पाकिस्तान देशाची कैफियत मांडताना इमरान खान यांनी आपल्या मूर्ख टिप्पणीतून व्यक्त केले ते रा. स्व. संघाबाबतचे मत. त्यांचे म्हणणे रा. स्व. संघाच्या विचारसरणीतून सध्या भारतात मुस्लिमांना वागवले जाते. गुजरातच्या दंगलीमध्येही गुंडांनी म्हणे मुस्लिमांचा छळ केला होता. आता काश्मीरमध्येही ३७० कलम हटवून रा. स्व. संघाचा विचार पूर्णत्वास आणला आहे. काश्मीरमध्ये म्हणे ५५ दिवस लोक बंद आहेत. भीतीच्या छायेत आहेत. घराघरात स्त्रियांवर बलात्कार होत आहे. रा. स्व. संघाच्या विचारानुसार हिंदू समाजाला श्रेष्ठ स्थान दिले जात आहे. काश्मीरमधला कर्फ्यू हटला तर तिथले मुस्लीम हातात हत्यार घेतील. रक्ताचे पाट वाहतील, मग मुस्लीम स्वस्थ बसणार नाहीत. आता इमरान यांच्या वक्तव्याला काय म्हणावे? असंबद्ध अद्वातद्वा असे शेंडाबुडखा नसलेले धादांत खोटे आणि कमालीच्या मूर्खपणाची बडबड इमरान यांनी केली. ऐकून संताप आला आणि मनोरंजनही झाले. वाटले, देशाच्या तमाम काँग्रेसी, डावे,विद्रोही, पुरस्कारवापसी गँग, तुकडे तुकडे गँग यांच्या पंक्तीत आता पाकिस्तानही आला. कारण, भारतामध्ये हे सारे जण रा. स्व. संघाचे नाव घेऊनच जगत आहेत. रा. स्व. संघाचे नाव घेतल्याशिवाय या लोकांना प्रसिद्ध मिळत नाही. अगदी कुत्रेही विचारत नाही. (खर्‍या कुत्र्यांनी माफी द्यावी) तर हे सारे जण आपण अस्तित्वात आहोत, हे दाखविण्यासाठी रा. स्व. संघाची निंदा करत असतात. का? तर त्या बहाण्याने आपण लोकांसमोर तरी येऊ. नेमके तेच इमरान यांनी केले. भारतातील काय पाकिस्तानच्या मुस्लिमांचेही पूर्वज कोण होते, हे जगजाहीर आहे. त्यामुळे इमरान ज्यावेळी हिंदू-मुस्लीम भेदावर जागतिक पटलावर बोलतात, त्यावेळी करमणूकच होते. इमरान खान यांना रा. स्व. संघाची इतकी भीती का वाटते? इतका द्वेष का वाटतो? बाकी इमरान खान यांना रा. स्व. संघाची वाटणारी भीती पाहून वाटते की, ये डर मुझे पसंद है।