ऊर्जा क्षेत्रात आता भारताचे ‘अच्छे दिन’

    दिनांक  29-Sep-2019 21:41:53नवी दिल्ली
: जगात सर्वात मोठा तेल निर्यातदार म्हणून ओळख असलेला सौदी अरेबिया हा देश येत्या काही दिवसांत भारतात तब्बल १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. सौदी अरेबियाचे सदिच्छादूत डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी ही माहिती दिली. सौदीच्या या निर्णयामुळे भारताला ऊर्जा क्षेत्रात व्यापारवृद्धी करण्यास मोठी मदत होणार आहे.


तेल
, गॅस, खाण आदी क्षेत्रांत सौदी अरेबिया हा मोठा निर्यातदार देश मानला जातो. ऊर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कृषि, खनिजे आणि खाण क्षेत्रात सौदी अरेबिया भारतात शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी अराम्को यासाठी पुढाकार घेणार आहे.