आयएनएस खांदेरीमुळे भारताची ताकद वाढली : संरक्षण मंत्री

28 Sep 2019 11:58:11


 


मुंबई : 'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयएनएस खांदेरी या पाणबुडीचे लोकार्पण केले. त्याचसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत 'निलगिरी'चादेखील जलावतरण सोहळा पार पडला.

 
 
 

'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी ६७ मीटर लांब व बारा मीटर उंच आहे. पाण्याखाली ३५० मीटर खोल ही पाणबुडी जाऊ शकते. तर समुद्रात सलग ६५०० नोटिकल्स माईल्स म्हणजेच १२ हजार किलोमीटर चा प्रवास ही पाणबुडी करू शकते. १५६५ टन वजन असलेली ह्या पाणबुडीत ११ किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात आली आहे. ६० किलोमीटर लांब केबल फिटिंग या पाणबुडीत करण्यात आली आहे.

 
काय आहे वैशिष्ठे? जाणून घ्या...  
 
या 'सायलन्ट किलर'ने वाढणार नौदलाची ताकद 
 

पाकिस्तानण्यांनो सावध रहा : राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानलाही टोला

 

आयएनएस खांदेरीच्या समावेशामुळे नौदलाची ताकद कशी वाढली आहे हे पाकिस्तानला कळायला हवे, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी केले. तसेच, पाकिस्तानचे प्रमुख इथून तिकडे जात त्यांनी कार्टुनिस्टला एक नवीन संधी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. "शिवाजी महाराजांचे समुद्रावरील वर्चस्वाचे राखण्याचे स्वप्न हे नौदल साकारत आहे. मात्र अजूनही काही भारताचे काही शत्रू समुद्रामार्गे हल्ला करण्याचा विचार करत आहेत. २६/११ प्रमाणे हल्ला करण्याचे त्यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही." असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

 
 
Powered By Sangraha 9.0