दीपान्तर गणराज्य : इंडोनेशिया

    दिनांक  27-Sep-2019 19:54:08   मार्क्स आणि लेनिनच्या विचारांवर चालणार्‍या संस्थांशी संबंध असणारेही कायद्याने शिक्षेचे मानकरी होतील. या सर्व कायद्यांमध्ये इंडोनेशियाला पोखरणार्‍या भ्रष्टाचाराला संपविण्याचा मुद्दा मात्र तसा उल्लेखित नव्हता, तर इंडोनेशियाच्या या होऊ घातलेल्या कायद्यांवरून रणकंदन माजले. अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली.इंडोनेशियामध्ये नवीन कायदा पारित होण्याचे संकेत होते. पण, हा कायदा पारितच होऊ नये म्हणून तिथे हजारो युवक - युवती रस्त्यावर उतरले. हिंसक आंदोलन सुरू झाले. या देशातले दशकामधले हे सगळ्यात मोठे विद्यार्थी आंदोलन म्हणावे लागेल. युवावर्गाच्या ताकदीने पारित होऊ पाहणारा कायदा इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना तूर्तास मागे घ्यावा लागला. पारित होणार्‍या नव्या कायद्यामध्ये विविध नियमांचे गठनच होते. जसे लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवताना आढळले तर गुन्हेगार ठरवले जाणार, समलिंगी लैंगिक संबंध असणारेही गुन्हेगार. तसेच विशिष्ट परिस्थिती सोडता गर्भपात केल्यास त्या महिलेलाही कायदेशीररित्या सजा होणार. ईशनिंदेचा कायदाही तसाच गडद आणि कडक. नव्या कायद्यानुसार ईशनिंदा तर सोडाच, पण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्याच्या विरोधात बोलणार्‍यालाही गुन्हेगार ठरवता येणार होते.मार्क्स आणि लेनिनच्या विचारांवर चालणार्‍या संस्थांशी संबंध असणारेही कायद्याने शिक्षेचे मानकरी होतील
. या सर्व कायद्यांमध्ये इंडोनेशियाला पोखरणार्‍या भ्रष्टाचाराला संपविण्याचा मुद्दा मात्र तसा उल्लेखित नव्हता, तर इंडोनेशियाच्या या होऊ घातलेल्या कायद्यांवरून रणकंदन माजले. अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली. ८७ टक्के मुस्लीम जनसंख्या, ७ टक्के ख्रिश्चन, १-२ टक्का हिंदू जनसंख्या आणि उरलेली इतर जनसंख्या असलेला हा ४० कोटीलोकसंख्येचा देश. या देशाने हा होऊ घातलेला कायदा नाकारला. हा कायदा नाकारणारे वेगवेगळ्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत. या कायदा नाकारणार्‍यांचे म्हणणे होते की, या कायद्याआड मुस्लीम शरियत कायदा लागू करण्याचा डाव सत्ताधार्‍यांचा आहे. आमच्या शयनगृहापर्यंत येऊन आमच्या खाजगी जीवनावर आघात करण्याचे हे षड्यंत्र आहे. याच पार्श्वभूमीवर या आंदोलनात उतरलेल्या महिलांचे म्हणणे आहे की, आमच्या भावनांवर आणि शरीरावरही स्त्री आणि माणूस म्हणूनही आमचाच अधिकार आहे, तर दुसरीकडे नव्या कायद्यात ईशनिंदेचा कायदा आणखी व्यापक होणार होता.या कायद्याच्या विरोधासाठीही लोक रस्त्यावर आले
. त्यात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यात उतरला होता. कारण, बहुसंख्य धर्माच्या ईश्वराची अर्थात अल्लाहची निंदा केल्यामुळे इंडोनेशियामध्ये तेथील कितीतरी अल्पसंख्याक लोक तुरुंगात खितपत आहेत. इंडोनेशियातल्या तानजंग बाली येथील धर्माने बौद्ध असलेल्या मेलैनाची आपबिती तर जगाच्या डोळ्यात अंजन घालणारी. शुक्रवारी मशिदीमध्ये मोठ्या भोंग्यामधून नमाज सुरू होता. तिने फक्त नम्रतेने इतकेच म्हटले की, “आवाज थोडा कमी कराल का?” यावर तिथे वादळ उठले. मुस्लीम गटाचा जत्था तिच्या घराभोवती गोळा झाला. नमाज ऐकायला नकार देते, अल्लाची प्रार्थना ऐकायला नकार देते म्हणजे अल्लाला नाकारते, म्हणजेच अल्लाची निंदा करते, असे ठरवले गेले. झाले, काहीही शहानिशा न करता तिला तुरुंगात डांबले गेले. अशा शेकडो घटना तिथे नियमित होतात, तर या अशा ईशनिंदा कायद्याच्या विरोधातही लोक रस्त्यात उतरलेले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्य याच्या विरोधात एकही शब्द उच्चारणे म्हणजे गुन्हा हे सुद्धा या कायद्यात. हे जे होते ते अराजक, हुकूमशाही, भ्रष्टाचाराला आमंत्रण करण्यासारखे होते. या सार्‍याच्या विरोधात इंडोनेशियाचा युवा रस्त्यावर उतरला. लढला आणि जिंकलाही. कट्टरतेविरोधात मानवतेशी मिळत्याजुळत्या असणार्‍या या लढ्यामुळे जगाला कळले की, ८७ टक्के मुस्लीम जनसंख्या असलेल्या देशातही कट्टरतेच्या विरोधात व्यक्ती आणि समाजस्वातंत्र्याचा लढा यशस्वी होऊ शकतो.मात्र
, या मानवतावादी विचारसरणीचे आश्चर्य वाटून घेताना इंडोनेशियाचा इतिहास विसरून चालणार नाही. काही शतकांपूर्वी हा इंडोनेशिया देश हिंदू साम्राज्याचा वैभवशाली भाग होता. मानवतावादी हिंदू संस्कृतीचे चलनवलन आजही तिथे आहे. इतके आहे की, तिथे काही ठिकाणी कुराणही संस्कृत भाषेत शिकवले जाते. असो, तर सांस्कृतिक भारताचे एक सहभागी राष्ट्र म्हणून इंडोनेशिया आजही भारताचा नातेवाईकच आहे. म्हणून तर त्याला ‘दीपान्तर गणराज्य’ संबोधले जायचे, तर कट्टरतेविरोधात लढलेल्या लढ्याबाबत इंडोनेशिया म्हणजेच दीपान्तर गणराज्यातील नागरिकांचे अभिनंदन!