भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात

27 Sep 2019 17:18:35




भूतान
: भारताच्या लष्करी सर्व पथकाचे हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळले. चिता या भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत २ पायलट शहीद झाले आहेत. खेंतोग्नमनी, योन्फ्युला, त्राशीगंगजवळच्या टेकडीवर हा बघत झाला. हा अपघात दुर्गमभागात झाला असल्याकारणाने मदतकार्यात अडथळे निर्माण झाल्याचे भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीत सांगितले.




शहीद झालेल्या दोन पायलटमध्ये एक भारतीय लष्कराचा लेफ्टनंट कर्नल रँकचा होता तर दुसरा भूतान सैन्याचा जवान असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. खराब हवामानमुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता आहे.

 

Powered By Sangraha 9.0