मी ४ थ्या क्रमांकावरही खेळू शकतो : या खेळाडूने केला दावा

    दिनांक  27-Sep-2019 16:35:33मुंबई : भारतीय क्रिकेट संघापासून दूर असणारा डावखुरा फलंदाज सुरेश रैना संघात परतण्यास उत्सुक आहे. त्याने टीम इंडियातील चौथ्या क्रमाकांसाठी स्वत:चा पर्याय सुचवला आहे. मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध रैनाने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. एका वृत्तपात्राला दिलेल्या मुलाखतीत याने ही इच्छा व्यक्त केली.

 

"मी भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. मी यापूर्वीही चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजीत चांगले प्रदर्शन केले होते. दोन विश्वकरंडक स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत आणि मी संधीच्या शोधात आहे." असे सुरेश रैना म्हणाला. भारतीय क्रिकेट संघामध्ये चौथ्या क्रमांकाच्या फंलंदाजीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. काही वेळासाठी अंबाती रायडूला या स्थानावर खेळवल्यानंतर विजय शंकरला त्याजागी स्थान दिले गेले होते. त्याच्यानंतर रिषभ पॅन्टला संधी देण्यात आली. परंतु, कोणीही यशस्वी ठरले नाहीत.