डॉ. बाळ फोंडके यांचे ‘चांद्रयान’ मोहिमेवर व्याख्यान

    दिनांक  26-Sep-2019 18:44:37मुंबई :  लोकमान्य सेवा संघ, पार्ले या संस्थेच्या वतीने येत्या शनिवारी दि. २८ सप्टेंबर रोजी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेचा हा दुसरा भाग असून ‘चांद्रयान’ वर हे व्याख्यान असणार आहे. यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक आणि नामवंत विज्ञानकथा लेखक डॉ. बाळ फोंडके उपस्थितांना संबोधित करणार असून संस्थेच्या पु. ल. देशपांडे सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी अधिकाधिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले असून ‘दै. मुंबई तरुण भारत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.