या 'सायलन्ट किलर'ने वाढणार नौदलाची ताकद

26 Sep 2019 13:34:56



मुंबई : भारताच्या नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने स्वदेशी निर्मिती असलेली पाणबुडी 'आयएनएस खंडेरी'चा भारतीय नौदल ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत 'वेस्टर्न नेव्हल कमांड'मध्ये याचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर 'आयएनएस विक्रमादित्य'वर स्वार होत संपूर्ण दिवस संरक्षण मंत्री समुद्राच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहे.

 

आयएनएस खंडेरीशिवाय २८ सप्टेंबर रोजी मुंबईतच नौदलासाठी 'पी - १७ ए' क्लासची आणखी एक नौकेचे अनावरण केले जाणार आहे. तसेच संरक्षण मंत्री यावेळी एका 'एअरक्राफ्ट कॅरिअर ड्राय डॉक'चेही उद्घाटन करणार आहेत. यामुळे मोठ्या युद्धनौकेचे दुरुस्ती किंवा नुतनीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Powered By Sangraha 9.0