जुलैमध्ये १४.२४ लाख नवीन रोजगार

    दिनांक  26-Sep-2019 14:06:56नवी दिल्ली : देशभरात जुलै महिन्यात एकूण १४.२४ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची आकडेवारी कर्मचारी राज्य विमा निगमतर्फे (ESIC) जाहीर करण्यात आली आहे. देशातील ताज्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये १२.४९ लाख नव्या नोकऱ्या जाहीर झाल्या होत्या. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने प्रसारित केलेल्या एका अहवालानुसार, २०१८-१९मध्ये ईएसआयसीसह एकूण १.४९ कोटी नोकरदारांची नोंदणी झाली आहे.

या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०१७ ते जुलै २०१९ दरम्यान ईएसआयसी योजनेत एकूण २ कोटी ८३ लाख जणांनी नावनोंदणी केली आहे. एनएसओचा हा अहवाल ईएसआयसी, ईपीएफओ, पीएफआरडीए आदीद्वारे नोंदणीकृत आकडेवारीद्वारे तयार केला जातो. एनएसओद्वारे ही आकडेवारी एप्रिल-२०१८पासून जाहीर केली जाते.