कोठडीत ठेवणे न्यायोचित व योग्य आहे: गडचिरोली सत्र न्यायालय
गडचिरोली : नक्षलवादी कारवायात सहभागी असल्याचा आरोप असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन गडचिरोली सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. ह्याविषयीचे आदेश २३ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले.
कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी नक्षलवादी प्रयत्नशील होते. त्यानुषंगाने पैसे, शस्त्रास्त्रे इत्यादींची व्यवस्था करण्यात आली. तपासाअंती पुणे पोलिसांनी याविषयी गुन्हा दाखल करून ऑगस्ट-२०१८ मध्ये या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली होती. गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, अरुण परेरा या चार आरोपींसह वकील सुरेंद्र गडलिंग यांनाही अटक झाली होती. सुरेंद्र गडलिंग यांनी गडचिरोली सत्र नायायालयात जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. सोमवार २३ सप्टेंबर २०१९ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने हा आदेश देत सुरेंद्र गडलिंग यांना जामीन देणे नाकारले आहे.
सुरेंद्र गडलिंग यांचेकडून ताब्यात घेण्यात आलेले संगणक व इतर इलेक्टोनिक वस्तू पोलिसांनी पुढील तपास करण्याकरिता फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे कि, अभिलेखावर असलेल्या पत्रांची पडताळणी केल्यावर आरोपी (सुरेंद्र गडलिंग) यांचा गुन्ह्यात समावेश दिसून येतो. त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवणे न्यायोचित व योग्य आहे. "