स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोकण रेल्वेची स्वच्छता मोहीम

    दिनांक  25-Sep-2019 14:33:10


 

स्वच्छ आणि हरित भारताच्या उभारणीसाठी स्वच्छ भारत उपक्रमहा महत्त्वाचा टप्पा आहे. स्वच्छ रेल-स्वच्छ भारतया मोहिमेअंतर्गत कोकण रेल्वे सर्व रेल्वेस्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता आणि जनजागृती अभियान राबवत आहेत.

या स्वच्छता अभियान पंधरवड्यानिमित्त कोकण रेल्वेने अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमा आणि जनजागृती मोहिमा राबवल्या. यासाठी रेल्वेस्थानकांवर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नुक्कड नाट्य सादर करण्यात आले. त्याशिवाय स्वच्छता मोहिमेत मुलांचा सहभाग वाढावा, यासाठी पेंटिंग आणि पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरी आणि कारवार भागातल्या कॉर्पोरेट कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्लास्टिकच्या वापरापासून प्रतिबंधया विषयावर मार्गदर्शन करणारी चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रवाशांशी चर्चा करून त्यांची मते आणि सूचना विचारात घेण्यात आल्या. रेल्वे गाड्या, पँट्री, अन्नपदार्थांचे विक्री स्टॉल आणि स्थानकांवर स्वच्छता तपासणी करण्यात आली. प्रवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्या भेट देऊन प्लास्टिकमुक्त भारतासाठी प्रोत्साहन देण्यात आले.