भारताच्या पायल जांगिडला गेट्स फाऊंडशनचा 'चेन्जमेकर' पुरस्कार

25 Sep 2019 17:02:39



नवी दिल्ली : राजस्थानमध्ये बालविवाह आणि बालकामगार विरोधात अभियान चालवणाऱ्या पायल जांगिडला 'चेन्जमेकर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे देण्यात येणाऱ्या 'ग्लोबल गोलकिपर्स अवॉर्डस्' कार्यक्रमामध्ये तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन न्युयॉर्कमध्ये करण्यात आले होते.

 

"हा पुरस्कार मिळाल्याने मी खुप आनंदी आहे. पंतप्रधान मोदींनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माझ्या गावामध्ये ज्या प्रकारे मी बालविवाह आणि बालकामगारांचे प्रश्न सोडवले आहेत, तसंच काम मला जागतिक स्तरावर करायचे आहे." असे पुरस्कार मिळाल्यानंतर पायलने पत्रकारांशी बोलताना सांगितले. पायल जांगिड ही १५ वर्षीय मुलगी राजस्थानमधील हंसला या खेडेगावामध्ये राहते. तिने स्वत: बालविवाहाला विरोध करत या कुप्रथेविरोधात आवाज उठवला. बालविवाह आणि बालकामगार थांबवण्यासाठी तिने जनजागृतीचे काम हाती घेतले. तिच्या या कामाची दखल बिल आणि मिलिंडा गेटस् फाउंडेशनने घेतली.

Powered By Sangraha 9.0