गुंतवणूकीची संधी : नवरात्रोत्सावात येणार 'आयआरसीटीसी'चा 'आयपीओ'

24 Sep 2019 18:48:10


नवी दिल्ली : नवरात्रौत्सवादरम्यान 'भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'तर्फे (आयआरसीटीसी) प्रार्थमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) सहाशे कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. आयआरसीटीसी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर दरम्यान बाजारात उतरण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे. २९ सप्टेंबर रोजी रविवारी शेअर बाजार बंद असल्याने ३० सप्टेंबरला हा आयपीओ खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयपीओअंतर्गत कंपनीचा १२.५ टक्के हिस्सा विकण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याद्वारे एकूण सहाशे कोटींचा निधी उभारण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. याबाबत अंतिम निर्णय गुंतवणूक आणि जन परिसंपत्ती प्रबंधन विभाग (दीपम) या विभागातर्फे करण्यात येणार आहे. आयआरसीटीसी अंतर्गत ९९.९९ टक्के हिस्सा हा सरकारकडे आहे. यातील एकूण समभागांची संख्या १५ कोटी ९९ लाख ९९ हजार ९९४ इतकी आहे. तर सात गुंतवणूकदारांकडे प्रत्येकी आठ समभाग आहेत.

दोन कोटी समभागांची विक्री केली जाणार आहे. समभागांचे दर्शनी मुल्य दहा रुपये इतके असणार आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात कंपनीला एकूण २७२.६० कोटींचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. याच वर्षात कंपनीला एकूण १ हजार ९५६. ६६ कोटी इतका महसुल मिळाला होता. विशेष म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. कंपनीच्या समभागांची किंमत १६० कोटी रुपये आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच कंपनीतर्फे केली जाणार आहे. 

Powered By Sangraha 9.0