'ड्रीम गर्ल' ची १०० कोटी क्लबमध्ये एंट्री

    दिनांक  24-Sep-2019 14:44:10


आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत असलेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाने १०० कोटींच्या कमाईचा एकदा पार करत जॉन अब्राहमच्या बाटला हाऊसला मागे टाकले. आयुषमान कायमच त्याच्या हटके भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे नुकतेच त्याची आर्टिकल १५ नावाची सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली. प्रेक्षकांनी त्याच्या या दोन्ही प्रयत्नांना भरघोस प्रतिसाद दिला. आणि पुन्हा एकदा आयुषमानच्या कामगिरीची प्रशंसा सर्वांनी केली.

ड्रीम गर्ल या चित्रपटाने आतापर्यंत ९५ कोटींची कमाई करत आता जवळपास १०० कोटींचा आकडा पार केला आहे. आणि या पार्श्वभूमीवर बाटला हाऊस च्या ८६ कोटींच्या कमाईपेक्षा जास्त कमाई केली आहे. आयुषमान कायमच मनोरंजक पण त्याचबरोबर एका बाजूला एखाद्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्ये झळकला आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.

ड्रीम गर्ल या चित्रपटात आयुषमान एका कॉल सेंटर मधील मुलाची भूमिका साकारत आहे. मात्र तो पूजा नावाने, मुलीच्या आवाजात ग्राहकांशी बोलत असतो. आणि कथेच्या एका वळणावर तो नुश्रत भरूचा हिच्या प्रेमात पडतो.