नीना कुलकर्णी यांची 'AB आणि CD' चित्रपटात एंट्री

    दिनांक  23-Sep-2019 15:44:35


 

अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठीची निर्मिती आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या चित्रपटातील एक महत्वाच्या कलाकाराच्या एंट्रीविषयी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रसिद्ध कलाकार नीना कुलकर्णी या आहेत. त्यामुळे ‘AB आणि CD’ या चित्रपटामध्ये आता आणखी एका चतुरस्त्र कलाकाराची भर पडली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरून त्यांनी काहीच दिवसांपूर्वी याविषयी चाहत्यांना माहिती दिली.

‘AB आणि CD’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीवअक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत, हे आत्तापर्यंत सर्वांना माहीत होते. मात्र, आता नीना कुलकर्णी देखील या चित्रपटाचा एक अविभाज्य भाग आहेत, हे कळल्यावर प्रेक्षकांना एक सुखद धक्का मिळाला आहे. मात्र त्यांची या चित्रपटातील भूमिका अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'AB आणि CD' या चित्रपटाच्या छोट्या-छोट्या गोष्टी आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या पोस्टर्स मधून आणि सोशल मीडियावरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाददेखील दिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.