काश्मिरातील ५० हजार बंद मंदिरे केंद्र सरकार खुली करणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |



बंगळुरू : जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने येथील अनेक वर्षांपासून बंद असलेली हजारो मंदिरे खुली करण्याचे संकेत सोमवारी दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली हजारो मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने हिंदू समाजाला न्याय दिल्याची भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आली.

जी. किशन रेड्डी काश्मीर खोर्‍यातील बंद मंदिरांबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ”आम्ही काश्मीर खोर्‍यात बंद पडलेल्या शाळांचा सर्व्हे करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे, या शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खोर्‍यातील सुमारे ५० हजार मंदिरे बंद अवस्थेत आहेत, ज्यातील काही मंदिरे नष्ट झाली आहेत.


अशा सर्व मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.” ९० च्या दशकात काश्मीर खोर्‍यात दहशतवाद मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याने लाखो काश्मिरी पंडितांना खोर्‍यातून पळ काढावा लागला होता. या काळात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या केल्या होत्या. तसेच अनेक मंदिरांचीही मोडतोड केली होती. काश्मिरी पंडितांच्या पलायनानंतर अनेक मंदिरे बंद पडली होती. त्यामध्ये काही प्रसिद्ध मंदिरांचाही समावेश आहे. अशी मंदिरे आता सरकारने खुली करण्याचा निर्णय घेत अनेकांना दिलासा दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@