ई-सिगारेटच्या विळख्यात तरुणाई!

    दिनांक  21-Sep-2019 12:37:15
सिगारेटीतून जाळला जाणारा तंबाखू, त्यातील निकोटिनचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, याची चर्चा करता करता काही शहाण्या उद्योजकांनी ई-सिगारेटचे उत्पादन बाजारात आणले. यातून तंबाखूचे दुष्परिणाम टाळता येणार असल्याची बतावणीही त्यांनी बेमालूमपणे केली. लोकही त्याला बळी पडत गेले. ही बाब तर नंतर उघड झाली की, तंबाखूला पर्याय देण्याचा उपद्व्याप हा बहुतांश प्रकरणात, पूर्वीच्या सिगारेट उत्पादक कंपन्यांनीच चालवला होता...
जपानमधील एका सिगारेट कंपनीविरुद्ध नागरिकांनी चालवलेल्या लढ्यावर प्रकाशित झालेली एक कादंबरी मध्यंतरीच्या काळात बरीच प्रसिद्ध झाली. कधी, कसे कुणास ठावूक, पण सिगारेट हा तेथील लोकांच्या जीवनमरणाचा विषय बनला. देशात ‘टोबॅको लॉबी’ तयार झाली. ती ताकदवान बनली. जनामनावर अधिराज्य गाजवू लागली. लोकांना लागलली तर्लें इतकी मजबूत होती की, दुसर्या महायुद्धाच्या काळात सिगारेटींचे अक्षरश: रेशनिंग करण्याची परिस्थिती त्या देशाने अनुभवली. एका माणसाला दिवसाकाठी र्ेंक्त तीनच सिगारेटी मिळतील, असा दंडक अंमलात आला. अगदी विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकापर्यंत हे रेशनिंग सुरू होते. सिगारेटीच्या दुष्परिणामांविरुद्धची पावलं म्हणून दरम्यानच्या काळात तिथल्या जनतेने या कंपन्यांविरुद्ध लढाही उभारला. सिगारेटींमुळे सामाजिक आरोग्यावर होणार्या परिणामांपेक्षाही स्वत:चे खिसे भरण्यातच मश्गूल असलेल्या कंपन्यांविरुद्ध सर्वसामान्य जनतेने उभारलेली लढाई इतिहास निर्माण करणारी ठरली. पैशाच्या प्रलोभनापासून तर जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंतचे, दबावाचे सारे तंत्र निष्प्रभ करीत लोकांनी कर्तबगारीने तो इतिहास निर्माण केला. आताही सिगारेट ओढणे पूर्णपणे बंद वगैरे झाल्याचे चित्र अजिबात नाही. उलट रेशनिंग संपल्यावर, दुष्काळातून आल्यागत लोकांनी उड्या मारल्या सिगारेटींवर. पण, याही स्थितीत त्याविरुद्ध लढणार्यांचा, लोकजागृती करणार्यांचा, त्याच्या दुष्परिणामांची जाहीर चर्चा करणार्यांचा एक समूह त्या देशात तेव्हाही होता, जेव्हा तिथे सिगारेट ओढणे हा प्रतिष्ठेच्या विविध निकषांपैकी एक होता. आणि आजही आहे, जेव्हा नकारात्मक परिणामांशिवाय त्यातून काहीच हाती लागत नसल्याचे पुरेसे स्पष्ट असतानाही तंबाखूचे सेवन करणार्यांच्या तुलनेत ते न करणार्यांचे प्रमाण नगण्य आहे म्हणून त्यांच्या भावना, त्यांचा लढा मातीमोल ठरवायला निघाले नाही तिथे कोणीच!
 

 
 
हेच अमेरिकेत आहे. नव्या पिढीतील तरुणाई ‘तंबाखू मुक्त’ करण्यासाठी म्हणून तिथल्या सरकारपासून तर विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत गांभीर्याने पावलं उचलली आहेत. जगभरातील गरीब व मध्यम स्वरूपाची अर्थव्यवस्था असलेल्या देशांतही हे अभियान अलीकडे वेगाने आकारास येते आहे. भारतात, सार्वजनिक आरोग्य हा आजवर कुणाच्याच अजेंड्यावरील विषय राहिलेला नसल्याने, सिगारेट, तंबाखूसेवनासारखे विषय महत्त्वाचे नव्हतेच मानले गेले कधी. वेष्टनावर ‘सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे’ एवढा एक वैधानिक इशारा देणे बंधनकारक केले की काम संपले, असे मानणारी यंत्रणा कार्यरत असल्याने हे सहज घडत गेले. बिडी, सिगारेटीनंतर ‘ई-सिगारेट’ नावाचा प्रकार केव्हा बाजारात आला, तो केव्हा प्रचलित झाला, केव्हापासून त्याचे प्रस्थ वाढले, वगैरे बाबी तर ध्यानातही आल्या नाहीत कुणाच्या. हळूहळू मगरमिठी घट्ट होत गेली, लोक क्षयासारख्या रोगाने पछाडले जाऊ लागले, तेव्हा त्याचे गांभीर्य येथील धुरीणांच्या ध्यानात येऊ लागले. सुदैवाने, त्यानंतर मात्र कठोर पावलं उचलण्यास सुरूवात झाली. तंबाखू सेवनाच्या वाईट परिणामांबाबत जनजागरण करण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी घालणारे कायदे निर्माण झाले. त्याची अंमलबजावणीही होऊ लागली. अशात परवा केंद्र सरकारने एक अध्यादेश जारी करत ई-सिगारेटवरील बंदीचा निर्णय जाहीर केला. नेहमीप्रमाणे त्यावर चर्वितचर्वण सुरू झाले.
 
सिगारेटींच्या माध्यमातून जाळला जाणारा तंबाखू, त्यातील निकोटिनचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, याची चर्चा करता करता काही शहाण्या उद्योजकांनी ई-सिगारेटचे उत्पादन बाजारात आणले. यातून तंबाखूचे दुष्परिणाम टाळता येणार असल्याची बतावणीही त्यांनी बेमालूमपणे केली. लोकही त्याला बळी पडत गेले. ही बाब तर नंतर उघड झाली की, तंबाखूला पर्याय देण्याचा उपद्व्याप हा बहुतांश प्रकरणात, पूर्वीच्या सिगारेट उत्पादक कंपन्यांनीच चालवला होता. तंबाखूयुक्त सिगारेटीही त्यांनीच विकल्या अन् तंबाखूला शिव्याशाप देत निर्मिलेल्या ई-सिगारेटींची भलावणही त्यांनीच केली. उलट आधीच्या तुलनेत आता ते पैशाने अधिक गब्बर झालेत. जनता मात्र तेव्हासारखीच आताही खितपत पडली आहे. यातून साकारलेले चित्र एवढे भयानक आहे की, ई-सिगारेट ओढणार्या वीशीच्या आतील मुलांची संख्या, धोक्याचा इशारा ठरावी इतकी वाढली आहे. अगदी वैश्विक पातळीवर याच इशार्याने पालक भयभीत झाले आहेत. भारतातले, जर्मनीतले अन् अमेरिकेतलेही.
 
मध्यंतरी दिल्लीच्या मयुर विहार मधील एका खाजगी शाळेने एक सर्वेक्षण केले. दहावी आणि त्यावरील वर्गात घालण्यात आलेल्या आकस्मिक धाडीत एका दिवशी ई-सिगारेटींची किमान दीडशे उपकरणे वर्गा-वर्गातून आढळलीत. गुडगावच्या एका शाळेतून निलंबित करण्यात आलेला इशान नावाचा दहाव्या वर्गातला विद्यार्थी, त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारादरम्यान सांगतो, की तो गेल्या काही वर्षांपासून ही सिगारेट ओढतोय्. तोच नव्हे, त्याच्यासारखी कितीतरी मुलं त्याला ठावूक आहेत, जी धूम्रपान करतात. तंबाखूच्या दुष्परिणामांची लांबलचक यादी पुढे करून सिगारेटीला पर्याय उभा करणार्या दीडशहाण्यांनी तरुणाईचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. धुम्रपानाची सवय सोडविण्याच्या या र्अेंलातून प्रयोगातून कित्येक लोक नव्याच व्यसनाला बळी पडताहेत. अमेरिकेत, तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले विद्यार्थी मोठ्याप्रमाणात आजारी पडत असल्याचे, त्यांना श्वसनसंस्थेशी संबंधित रोगाने घेरले असल्याचे ध्यानात येताच तिथल्या सरकारने औद्योगिक पिछेहाटीची, उद्योजकांच्या नाराजीची थोडीशीही चिंता न करता सरसकट ई-सिगारेटी व धूम्रपानाच्या अन्य उपकरणांवर बंदी जाहीर केली. भारतात याच निर्णयाची घोषणा परवा निर्मला सीतारामन यांनी केली.
 
एका सिगारेटीचे व्यसन सोडविण्याच्या नावाखाली दुसर्याच व्यसनाच्या गर्तेत आपण तरुणांना ढकलत असल्याच्या वास्तवाचे भान विसरून इथले उद्योजक या ई-सिगारेटींचा धंदा करीत राहिले. खोर्याने पैसा ओढत राहिले. देशाच्या उज्जवल भविष्याचे प्रतिनिधी मात्र व्यसनाधीनतेच्या मार्गावर खितपत पडले. त्यांचे भविष्य इतस्तत: विखुरले. आणि या उत्पदनांवर बंदी घालण्याचा निर्णय झाला, तर आम जनतेसाठी तो खिल्ली उडविण्याचा विषय ठरला! कालपर्यंत चौकातल्या पानटपरीवर पाच रुपयात मिळणारी सिगारेट...पण स्वरूप बदलले अन् आता अॅमॅझॉनसारख्या मोठ्या बाजारकेंद्रांतून दीड ते पाच हजार रुपयांत ती मिळू लागली. लत तर दोघांचीही लागते. सोडवत यातील एकही नाही. पण, तंबाखूचे परिणाम टाळण्यासाठी ई-सिगारेटचे भूत लोकांसमोर उभे करण्यात आले. लोकांच्याही ते सहज पचनी पडले. आज परिणाम हा आहे की, तंबाखू तर सुटला पण या महागड्या सिगारेटची सवय लागलीय् लोकांना, जी सोडता सोडवत नाहीय्. त्याचे साईड र्इेंेक्ट्स नसल्याचा दावा तर खोटा ठरलाच, पण ही सिगारेट काही गंभीर आजार, लोकांच्या पदरात टाकून जाते आहे. अमेरिकेत तर काही मृत्यू आणि र्ेंुर्फ्ेंुसांच्या अनाकलनीय रोगांचे प्रमाण बघून हादरण्याची वेळ तिथल्या सरकारवर आली आहे. इथेही, अजून ठोस प्रकरणं समोर आलेली नसली तरी ई-सिगारेटीच्या वापरकर्त्यांचे वाढते प्रमाण, धोक्याच्या इशार्यासाठी पुरेसे आहे. कधी कुणाचीतरी बरोबरी करण्यासाठी, तर कधी इतरांच्या तुलनेत स्वत:चे पुढारलेपण सिद्ध करण्यासाठी, श्रीमंतीची निशाणी असलेली ही सिगारेट एकदा हातात धरली की, त्याचे व्यसन पिच्छा सोडत नाही. यामुळे तंबाखूपासून मुक्ती मिळते, एवढाच काय तो दावा खोटा आहे. या नव्या सिगारेटीत वापरले जाणारे रासायनिक पदार्थ त्याहून घातक आहेत, हे मात्र कुणीच सांगत नाही. बरं, बाजारपेठेवर या बंदीचे काय परिणाम झाले असतील? काहीच नाही. उलट, काल तंबाखूयुक्त सिगारेटींची जागा घेत ई-सिगारेटींनी मार्केट मिळवले होते. आता बंदीनंतर त्याची जागा पुन्हा जुन्या सिगारेटींनी घेतली आहे. आयटीसी लिमिटेड, गॉर्डे्रंे र्िेंलिप्स इंडिया लि., व्हीएसटी इंडस्ट्रीज लि., गोल्डन टोबॅको लि., या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव परवाच्या निर्णयानंतर अगदी काही तासातच वधारले आहेत. अर्थात, जनतेच्या आरोग्याशी चाललेल्या जीवघेण्या खेळाचे दरही तसेच आहेत. वधारलेले....!