नवरात्रीत पूजासामग्रीला देऊ नवी झळाळी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |



हिंदू संस्कृतीमध्ये देवीची उपासना ही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. देवी हे आईचे रूप आहे. त्यामुळे तिची पूजा केली तर ती लवकर प्रसन्न होते, असा अनुभव आहे. त्यामुळे कुठल्याही समारंभात कुलदेवता आणि गणपती यांची प्रथम पूजा होते. देवीची पूजा ही जशी दैनंदिन स्वरूपात केली जाते तशीच सलग नऊ दिवस अर्थात नवरात्रीच्या स्वरूपातही केली जाते. यातही शारदीय नवरात्र म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी या काळात होणारा देवीचा उत्सव अतिशय महत्त्वाचा असतो.




 

 

कोणतीही पूजा हा श्रद्धेचा विषय असतो आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या पूजेतून अपेक्षित फळ मिळतेच, असा अनुभव येतो. त्यामुळेच पूजेत योग्य ती पूजासामग्री वापरणं अतिशय आवश्यक आहे. साधारणपणे पूजासामग्री ही तांब्या-पितळ्याची किंवा चांदीची असते. त्याशिवाय देवीच्या मूर्तीदेखील पितळ्याच्या किंवा चांदीच्या असतात. याचं कारण म्हणजे या धातूंमध्ये त्रिगुणांपैकी सत्त्व गुण व पंचतत्त्वांपैकी तेज तत्त्व आकृष्ट करण्याची आणि पूजकाकडे प्रसारित करण्याची क्षमता अधिक असते. परंतु, त्यासाठी पूजासामग्री लख्ख चमकवलेली असायला हवी.

 

हवेतल्या आर्द्रतेमुळे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांवर हिरवट थर जमा होऊन ती निस्तेज दिसू लागतात आणि चांदीची भांडी काळवंडलेली दिसतात. हा थर रासायनिक अभिक्रियेचा असल्याने इतर भांडी घासण्याचा साबणाने तो दूर होत नाही. चांदी साफ करण्यासाठी सराफाकडे अर्थात ज्वेलर्सकडे नेली जाते. पण तिथे ‘अॅसिड बाथ देऊन सफाई होत असल्याने मौल्यवान चांदीची झीज होण्याची शक्यता असते. शिवाय चांदीच्या देवीच्या मूर्ती साफ करण्यासाठी घराबाहेर नेता येत नाहीत.

 

 

आता मात्र ही समस्या सहजपणे दूर झालेली आहे. कारण. तांब्या-पितळ्याला स्वच्छ आणि लख्ख करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून घरोघरी वापरली जाणारी पितांबरी शायनिंग पावडर चांदीलाही नवी चमक देते. इतकेच नव्हे, तर पितांबरी शायनिंग पावडरमुळे आता तांबे, पितळ, चांदी, ल्युमिनियम, लोखंड आणि स्टेनलेस स्टील या सर्व धातूंची भांडी सहजपणे नव्यासारखी लख्ख होतात. त्यात कोणताही घटक रसायन नसल्यामुळे हातांवरही त्याचा कोणताही परिणाम होत नाही. शिवाय पितांबरी शायनिंग पावडरमध्ये प्रसन्न करणाऱ्या सुगंधाचाही समावेश करण्यात आलेला आहे. अशा पितांबरी शायनिंग पावडरमुळे नवरात्रीत देवीच्या पूजेतून मांगल्याच्या अनुभूतीसोबत सुगध आणि आनंदाचीही प्राप्ती होईल.




 

@@AUTHORINFO_V1@@