'पाकिस्तान हा धक्के खाणारा देश आहे, परंतु भारत कायमच उंच भरारी घेतो' - सय्यद अकबरुद्दीन

20 Sep 2019 12:58:14



नवी दिल्ली
: कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु वारंवार तोंडघशी पडूनही पाकिस्तानला अजूनही जग येत नाही. आता पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीर मुद्दा २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेत उपस्थित करणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत तोंडघशी पडल्यांनंतर आता पुन्हा हा प्रस्ताव महासभेत मांडण्याचं घाट पाकिस्तान घालत आहे. परंतु याबाबत संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. त्यांनी म्हणले की
, " पाकिस्तान जितक्या खालच्या स्तरावर जाऊन भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, तेवढीच भारताची जगासमोर मान उंचावेल. पाकिस्तान हा कायम धक्के खाणारा देश आहे, परंतु भारत कायमच उंच भरारी घेतो."


पुढे ते असेही म्हणले की
, "पंतप्रधान मोदींनी आपल्या द्विपक्षीय बैठकांमधून जगासमोर भारताचे कार्य अधोरेखित केले आहे. त्यांच्या व्यस्ततेवरूनच ते जगासमोर भारताचा आदर्श ठेवत आहे. पाकिस्तान दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्रांसमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला कसे सादर करावे याचे अनेक पर्याय देशासमोर असतात. पण काही देश आपले म्हणने मांडण्यासाठी खालच्या स्तराला जाऊ शकतात. पण यात आमचा स्तर उंचावेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुमचा स्तर जितका खालावेल, तितकी आम्ही उंच भरारी घेऊ”.

Powered By Sangraha 9.0