कोर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |




पणजी : उद्योग क्षेत्राला भरारी देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपन्यांच्या कोर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अध्यादेश आणून नव्याने स्थापन होणाऱ्या देशांतर्गत कंपन्या, नवीन स्थानिक गुंतवणूकदार कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय घेतला. गोव्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तीकर कायद्यामध्ये केंद्र सरकारने काही नवीन बदल समाविष्ट केले आले आहे. १ ऑक्टोबरनंतर स्थापन झालेल्या कोणत्याही नवीन देशांतर्गत कंपन्या १५ टक्के दराने आयकर भरू शकतात. नव्याने गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांसाठी सर्व अधिशेष आणि उपकरांसह प्रभावी दर १७.०१ टक्के राहील. इतर कंपन्या त्यांची मुदत संपल्यानंतर कमी दराने कर भरणे निवडू शकतात.'' देशाला मंदीच्या सावटापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे उद्योग क्षेत्रातून स्वागत करण्यात आले.

गोव्याची राजधानी असणाऱ्या पणजी याठिकाणी आज जीएसटी कौन्सिलची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. तत्पूर्वीच निर्मला सीतारामन यांनी या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. या निर्णयाच्या घोषणेनंतर सेन्सेक्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे ९०० अंकांनी वधारला.


@@AUTHORINFO_V1@@