मुंबईत इमारत दुर्घटना ; जीवितहानी नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |



मुंबई
: मुंबईतील लोकमान्य टिळक रोडवरील कॉफर्ड परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीचे नाव अहमद असे असून सकाळच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत अगोदरच धोकादायक असल्याच्या कारणावरून रिकामी करण्यात आलेली होती. त्यामुळे सुदैवाने या इमारत दुर्घटनेत कोणतिही जीवित हानी झाली नाही. परंतु इमारतीखाली लावण्यात आलेल्या गाड्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारत ६ मजली असल्याकारणाने जमलेला ढिगारा काढण्याचे काम सुरु आहे.

@@AUTHORINFO_V1@@