सुप्रियो यांच्यावरील हल्ल्यानंतर अभाविपचा देशव्यापी जनसंपर्क कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली
: जाधवपूर विद्यापीठात केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर झालेल्या हिंसाचार आणि हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)ने एक संपर्क कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा केली. अभाविपने डाव्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या राजकारणाचा हिंसक चेहरा उघड करण्यासाठी हा देशव्यापी संपर्क कार्यक्रम सुरू करणार आहे. तृणमूलवर पलटवार करताना अभाविपने नमूद केले की, राज्यपाल विद्यापीठाचा कुलपती असल्याने कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्याची परवानगी त्यांना आवश्यक नसते. अभाविप देशभरातील कॅम्पसमध्ये आपल्या सदस्यांवर होत असलेल्या राजकीय हिंसाचाराविरोधात एकत्र येत चर्चेला सुरुवात करणार आहे.


अभाविपचे राष्ट्रीय सह संघटक सचिव श्रीनिवास म्हणाले की
, “ही चळवळ आपल्या सहकार्यांविरोधात निर्माण झालेल्या असहिष्णुतेमागील ढोंगीपणाला उघड करेल. देशातील डाव्या विचारवंतांच्या बौद्धिक दहशतवादाचा पर्दाफाश करण्याची वेळ आता प्रत्येक महाविद्यालयावर आली आहे. अभाविप त्यांच्या असभ्यतेचा आणि ढोंगीपणाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वत: चळवळ सुरु करेल. विद्यार्थी संघटनेतील समविचारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि विरोधी पक्षांच्या हिंसक राजकीयचालीं उघड करण्याची आता वेळ आली आहे."


जाधवपूर विद्यापीठातील हिंसक आणि केंद्र सरकारविरोधी निषेधांमुळे वादात सापडले आहे.
तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे की, सुप्रियोला होस्ट करण्यासाठी अभाविपने परवानगी मागितली नव्हती. अभाविपमधील अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, “आम्ही पोलिसांकडून परवानगी मागितली आहे आणि हे सर्व लेखी स्वरूपात आहे." हा कार्यक्रम नव्याने आयोजित करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळावी अशी अभाविपची मागणी आहे. तर तृणमूल कॉंग्रेसकडूनही निदर्शने केली जात आहेत. भाजपला राज्यातून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप अभाविप करत आहे.

@@AUTHORINFO_V1@@