भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांनाच यशाचे श्रेय : नितीन गडकरी

19 Sep 2019 13:00:16


- 


"भाजपमध्ये 'कोटा सिस्टीम' नाही : बायका-मुलांना तिकीट मागू नका !"

 

नागपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्यांवर नितीन गडकरी यांनी यापूर्वीही उघड भूमिका घेतली आहे. मात्र, आता नातेवाईकांना तिकीटे मागणाऱ्यांकडेही त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. "भाजपमध्ये उमेदवारीसाठी कोटा सिस्टम नाही, तिकीट कुणाला द्यायचे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल, काम पाहूनच तिकीट देण्यात येईल, त्यामुळे तिकीट मिळाले नाही, तर बायका-मुलांना तिकीट द्या, अशी मागणी करू नका," अशा कानपिचक्या गडकरींनी कार्यकर्त्यांना दिल्या.

 

भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांना यशाचे श्रेय !

भाजपच्या विदर्भ प्रदेश विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. "तिकिट न मिळालेल्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा मोठा अनुभव माझ्याकडे आहे," असे ते म्हणाले. "पक्षात काहीच न मिळालेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. आज सर्वत्र भाजपची सत्ता आहे. त्याचे श्रेय पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे," असेही गडकरी यावेळी म्हणाले.

Powered By Sangraha 9.0