'शुभ मंगल ज्यादा सावधान' मधील भूमिकांची ही झलक...

    19-Sep-2019
Total Views |


आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत असलेल्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातील भूमिका उघड करणारी एक छोटीशी झलक आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'जीतेगा प्यार सेहपरिवार' या चित्रपटाच्या टॅगलाईनसह आयुषमान ने देखील ही झलक सोशल मीडियावरून शेअर केली.

'शुभ मंगल सावधान' च्या यशानंतर आता 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत गजराज राव म्हणजेच चित्रपटातील शंकर त्रिपाठी, आईची भूमिका साकारताना नीना गुप्ता म्हणजेच सुनैना त्रिपाठी, पंखुरी अवस्थी- कुसुमच्या भूमिकेत, जितेंद्र कुमार -अमन त्रिपाठी यांच्या भूमिकेत, आयुषमान खुराना- कार्तिक सिंहच्या भूमिकेत, मनुरीशी चड्ढा-चमन त्रिपाथीच्या भूमिकेत, सुनीता रजवार-चंपा त्रिपाठीच्या भूमिकेत, मानवी गागृ-गुगल त्रिपाठीच्या भूमिकेत, नीरज सिंह- केशव च्या भूमिकेत अशी मजेदार पात्रं या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. पण त्याच बरोबर एक हटके स्टोरी सुद्धा पाहायला मिळेल.

'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाने आयुषमान खुरानाला अभिनयाच्या दृष्टीने एक वेगळ्या स्तरावर नेऊन पोहोचवले. 'शुभ मंगल सावधान' मध्ये तत्कालीन समाजात एका वजन जास्त असलेल्या मुलीशी लग्न करणे म्हणजे एक चर्चेचा विषय ठरत असे. याच विषयाला हात घालून त्या चित्रपटाने प्रेक्षकांना एक हटके विचार करायला भाग पडले आणि एक वेगळा दृष्टिकोन दिला. आता समलैंगिक संबंधाच्या विषयावर आधारित असलेला 'शुभ मंगल ज्यादा सावधान' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.