राजनाथ सिंह यांचे 'तेजस'मधून उड्डाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |
 
 
ठरले या विमानातून उड्डाण करणारे पहिले संरक्षण मंत्री



नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी बंगळूरु येथून स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. संरक्षण मंत्रालयाचा कारभार पाहिल्यानंतर त्यांचे हे पहिले उड्डाण आहे. तसेच तेजसमधून उड्डाण करणारे ते पहिले संरक्षण मंत्री ठरले आहेत.

 

राजनाथ सिंह २८ सप्टेंबर रोजी मुंबईत नौदलाच्या तीन योजनांचा शुभारंभ करणार आहेत. स्कॉर्पियन क्लासची दुसरी पाणबुडी आयएनएस खंडेरी नौदलात सामाविष्ठ करणार आहेत. त्याशिवाय पी-१७ सिरीजची पहिली युद्धनौका आयएनएस निलगीरीचाही शुभारंभ होणार आहे.


तेजस हे लढाऊ विमानाचा वेग १.६ मॅक इतका आहे. दोन हजार किमी रेंज असलेल्या तेजसचे सर्वाधिक थ्रस्ट केजीएफ ९१६३ इतके आहे. यात ग्लास कॉकपीट, माउंटेड डिस्प्ले, मल्टी मोड रडार, कम्पोझिट स्ट्रक्चर, फ्लाई बाय वायर डिजिटल सिस्टम, अशा अत्याधूनिक सुविधा आहेत. या विमानावर दोन आर-७३, एअर टू एअर मिसाइल, हजार एलबीएस क्षमतेचे दोन बॉम्ब, लेझर डेझिग्नेशन पॉड आणि ड्रॉप बॉक्सचाही सामावेश आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@