'अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकडे भारताची वाटचाल' : प्रकाश जावडेकर

19 Sep 2019 18:56:33




नवी दिल्ली
: देशातील आर्थिक संकटात सापडला आहे. अशी ओरड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की
, "देशात कोणतेही आर्थिक संकट नाही.अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे." जावडेकर हे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


ते
म्हणाले, "सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटात नाही. गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून काही प्रतिक्रिया आल्या आहेत आणि त्यांच्या सर्व समस्यांवर सरकार विचार करत आहे.


अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रम
'हाऊ दि मोदी' वर कॉंग्रेसने हल्लाबोल केला यावर बोलताना जावडेकर म्हणाले की, "कॉंग्रेसला मोदींसारखी संधी कधीच मिळाली नाही. 'हाऊ दि मोदी' हा कार्यक्रम असलेले स्टेडियम यापूर्वी हाऊसफुल झाले आहे. कॉंग्रेसला इतकी लोकप्रियता कधी मिळाली नाही आणि कधीच मिळणार ही नाही. मी एवढेच सांगू शकतो की 'अंगूर खट्टे है' अशी प्रवृत्ती सध्या काँग्रेसची झाली आहे. जावडेकर यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालय आणि पर्यावरण व हवामान बदल या मंत्रालयाचा कार्यभार आहे.


कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी हल्ला चढविला आणि ते म्हणाले की
, "कॉंग्रेससुद्धा त्यांना गांभीर्याने घेत नाही. आपण का यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे ? मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आम्ही त्याची मानसिकता पाहिली. तेव्हापासून ते अशी विधाने करत आहेत."

Powered By Sangraha 9.0