मतदान 'ईव्हीएम'द्वारेच : निवडणूक आयोगाची ठाम भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |



मुंबई
: येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आपण शासकीय पातळीवर निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी ही माहिती दिली.


अरोरा म्हणाले
, "देशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी शासकीय पातळीवर निवडणूक आयोग सज्ज असून राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारी व सूचनांवर देखील विचार केला जात आहे. काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदारांविषयी तक्रार केली होती.त्यावर निवडणूक आयोगाने दाखल घेतली असून काम सुरु आहे. निवडणूक काळात तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांतून पोलिसयंत्रणा मागविण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


बॅलेट पेपर संदर्भात बोलताना अरोरा म्हणाले कि
, "बॅलेट पेपर ही देशातील इतिहासजमा झालेली पद्धती आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुका या ईव्हीएमद्वारेच घेण्यात येतील. ज्या राजकीय पक्षांनी याबाबत मागणी केली होती त्यांची ही मागणी पूर्ण होणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ईव्हीएम मधील आधुनिक बदल करून निवडणुका सुरळीत पार पाडाव्या हाच आमचा प्रयत्न आहे. तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि, याबाबत कोणतेही बदल केलेले नसून उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादा पूर्वीप्रमाणेच आहेत. यापुढे सर्व पोलिंग बूथ हे तळमजल्यावरच असणार आहेत. वरिष्ठ नागरिकांनी याबाबत मागणी केली होती.

@@AUTHORINFO_V1@@