सोनाली कुलकर्णीचा ‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबरला होणार प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |


वेळेचे पाऊल आणि विक्की वेलिंगकरची चाहूल, फक्त काळालाच कळते!अशा आशयाचे विक्की वेलिंगकरचे पोस्टर झाले प्रदर्शित

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे प्रणव चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्यातून प्रस्तुत करत आहेत मराठी चित्रपट विक्की वेलिंगकर’. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी केली आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडीओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांची आहे. वेळेचे पाऊल आणि विक्की वेलिंगकरची चाहूल, फक्त काळालाच कळते !”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आणि त्याद्वारे या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे.

विक्की वेलिंगकरही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची हे कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी मिकी व्हायरसआणि ७ अवर्स टू गोआदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी आणि असेच अनेक गाजलेले मराठी चित्रपट तिच्या नावावर आहेत. विक्की वेलिंगकर६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@