किआरा अडवाणीची भूल भुलैय्या २ च्या टीममध्ये एंट्री

18 Sep 2019 13:22:02


अक्षय कुमारच्या भूल भुलैय्या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर सध्याचा अगदीच अभिनेता कार्तिक आर्यन आणि आज जाहीर केलेल्या माहितीनुसार किआरा अडवाणी भूल भुलैय्या २ मध्ये झळकणार आहेत. विद्या बालनने भूल भुलैय्या मधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पडली होती आता किआरा अडवाणी या भूमिकेला कसा न्याय देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भूल भुलैय्या २ मधून कार्तिक आणि किआरा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात चित्रपटाच्या शुटींगच्या शुभारंभ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान कार्तिक आर्यन 'पती पत्नी और वोह' या त्याच्या आगामी चित्रपटात भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्याबरोबर तर इम्तियाज अली यांच्या लव्ह आज कल या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले असल्यामुळे आता तो भूल भुलैय्या च्या शूटिंगसाठी तयार आहे.

Powered By Sangraha 9.0