राणे लवकरच भाजपमध्ये ! नितेश राणेही भाजपच्या तिकीटावर लढणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |

 


सिंधुदूर्ग : नारायण राणे भाजपमध्ये जाणार कि नाही यावर गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लावले जात होते. कोकण आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तूळात राणेंचे काय होणार याची उत्सूकता साऱ्यांनाच आहे. नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करण्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता खुद्द नारायण राणे यांनीच भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

 

लवकरच मी माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. "माझा मुलगाही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे.", असे सांगत त्यांनी नितेश राणे यांच्याही भाजपप्रवेशाबद्दल सुतोवाच केले.

 

दरम्यान, शिवसेनेचा अंतर्गत विरोध असल्याने राणे यांचा भाजपप्रवेश लांबल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता राणे यांनी त्याला दुजोरा दिल्यामुळे सिधुदूर्गात शिवसेनेपुढे मोठे आव्हान तयार होणार आहे. राणे यांनी आपला पक्षप्रवेश हा मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, असे सांगितल्याने या प्रकरणी शिवसेनेची प्रतिक्रीया महत्वाची ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@