जाणून घ्या कशी आहे भारतातील पहिली 'ई-सायलकल'

    दिनांक  17-Sep-2019 16:55:26'यामाहा' आणि 'हिरो' या आघाडीच्या कंपन्यांनी एकत्र येत एक इलेक्ट्रोनिक सायकल लॉन्च केली आहे. भारतातील पहिली ई-सायकल, अशी ओळख असणाऱ्या EHX20 हे नाव दिले आहे. हिरो सायकल भारतात लॅक्ट्रो ब्रॅण्ड अंतर्गत काही इलेक्ट्रोनिक हायब्रिड सायकल विकतात. ई-सायकल निर्मितीच्या क्षेत्रात उतरणारी हिरो ही पहिली कंपनी आहे.


हिरो मोटार आणि सायकल्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, ही सायकल एका चार्जिंगमध्ये ८० किमी धावू शकते. या सायकलमध्ये पावर मोटार सेंटर देण्यात आले आहे. या सायकलची गती ताशी २५ किमी इतकी असणार आहे. या सायकलमध्ये एकूण २० गिअर आहेत.

विशेष म्हणते तुम्हाला ही सायकल चालवताना कोणत्याही वाहन परवान्याची गरज भासणार नाही. या सायकलची किंमत बाजारात १ लाख ३० हजार इतकी आहे. तेव्हा सज्ज व्हा सायकलींचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा !